आमच्या विषयी
ह.भ.प. दिनकर
अल्प परिचय
पूर्ण नांव:- श्री. दिनकर रंगराव महाडिक.
गांव :- इटकरे, ता. वाळवा, जि. सांगली, पीन 415403
दीक्षानाम:- ह.भ.प. दिनकर.
हरिभक्त परायण दिनकर यांचे आजोबा:
कै. राउसो नानासाहेब महाडिक.
हरिभक्त परायण दिनकर यांचे वडील :
परमपूज्य स्वामी महाराज ब्रह्मीभूत कै. रंगराव राऊसो महाडिक.
(शेती, श्रीमद ज्ञानेश्वरी चे अभ्यासक, प्रवर्तक, श्रीमद्गीता ज्ञानेश्वरीच्या प्रसारासाठी प्रवास, स्वग्राम इटकरे येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या प्रारंभासाठी प्रेरणा)
श्री. दिनकर यांची टोपण नावे:-
(प्रसिध्दीसाठीची) विजयाग्रज, रविराज भवानीवरद, सविता सव्यसाची.
जन्म दिनांक:- ५ मे १९५४, रेठरे धरण, ता. वाळवा, जि. सांगली येथे.
शिक्षण :- बी.ए. (ऑनर्स, इंग्लिश) डी. आय. टी.
शिक्षण स्थळे :-
प्राथमिक:- इटकरे.
माध्यमिक:- येलूर हायस्कूल, येलूर.
महाविद्यालयीन: कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर.
व्यवसाय:- महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी (सेवानिवृत्त), सेवानिवृत्ती सन २०१०, शेती.
गाढे व्यासंगः– मराठी व इंग्रजी साहित्य, मराठी संत वाङमय, वैदिक वाङमय उपनिषदे, पुराणे, प्राचीन आर्वाचीन संत चरित्रे, मराठी थिऑसफीकल फेडरेशनचे वाङमय.
अल्प अभ्यास:- हिंदी व संस्कृत वाङमय, बायबल, कुराण तसेच अनेक धर्म व पंथातील वाङमय विविध धर्मातील संतचरित्रे. अमर मराठी भक्तिसंगीत, हिंदी सुगम संगीत (चित्रपट-नाटय-स्वतंत्र) विज्ञान, शेती, माहिती तंत्रज्ञान.
नित्य गाढ़ा व्यासंग : ॥ श्रीमद् गीता ज्ञानेश्वरी ॥
लेखन :- पूर्वआयुष्य.
वयाच्या चौदाव्या वर्षी गाव पातळीवर हस्तलिखित दैनिक विशाल तुकामाई, साप्ताहिक करमणूक – एकटाकी.
वयाच्या सोळाव्या वर्षी बालकथा, बालकविता लेखनाने साहित्य लेखनास प्रारंभ, पुढे कथा-कविता- कादंबरी नाटक, लेख, ललितलेख,सामाजिक समस्येबाबतचे लेख प्रतिक्रियात्मक लेख, सूचनात्मक पत्रे, गीतांवरील रसास्वादात्मक लेखमाला इ. विविध प्रकारचे लेखन.
ज्यातून थोडेफार साहित्य प्रसिध्द झाले त्या दैनिक / साप्ताहिके / नियतकालिके यांची नावे:–
दैनिकैः पुढारी, सकाळ, सत्यवादी, राष्ट्रप्रगति (कोल्हापूर) ,जनप्रवास (सांगली-मिरज) अग्रदूत, प्रभात दर्शन (सांगली).
साप्ताहिके:- स्वराज्य, तेजस्वी (पुणे), गांवकरी, आपण (नाशिक), साप्ताहिक ओळख (इस्लामपूर).
पाक्षिक:- अश्वमेध (काव्य) मुंबई.
नियतकालिके :- ज्योती (के.बी.पी. कॉलेज, इस्लामपूर.) करुणा (नाशिक), नंदादीप (कोल्हापूर).शिवाय राष्ट्रप्रगति, सत्यवादी (दिवाळी अंक).
लेखमाला प्रसिध्द :- दै. जनप्रवास, (मिरज-सांगली),साप्ताहिक ओळख(इस्लामपूर).
मुक्त पत्रकार या नात्याने काही वृत्त लेखन, विशिष्ट सदरात लिहिण्यासाठी अन्य दोन टोपण नावे.
नाटय–काव्य – व्याख्यान इ. मधील सक्रियता (पूर्व आयुष्य)
“साहित्य शारदा” नामक हौशी नाटय मंडळाची स्थापना. नाटकाचे दिग्दर्शन आणि भूमिका.नाट्यगीतांच्या चाली.
कविता स्पर्धात सहभाग- पारितोषिके ,काव्य वाचनाचे कार्यक्रम.
काव्यवाचनाच्या कार्यक्रमात सहभाग(इस्लामपूर, सांगली, मिरज, कोल्हापूर ,कामेरी इ. ठिकाणी).
कथाकथना चे कार्यक्रम, शिवचरित्रावर व्याख्यान.
अमर हिंदी, मराठी सुगम संगीतावर चर्चा परिचर्चा परिसंवादात भाग.
शैक्षणिक सक्रियता :- (पूर्व व उत्तर आयुष्य)
शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक मार्गदर्शन, बौध्दिक शारीरिक एकूणच व्यक्तिमत्व विकासासाठी खास प्रयत्न. अनेक शैक्षणिक विषयाची भीती घालवून, त्याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात गोडी उत्पन्न करुन, गती देण्याचे काम. अनेक विद्यार्थ्यांचे श्रध्दास्थान (यात पुढे गृहस्थाश्रमी झालेले विद्यार्थीही.) अत्यल्प – नाममात्र फी स्विकारुन तर बहुतेक वेळा परिस्थितीनुरुप विनामूल्य अशी ही शैक्षणिक सेवा.
शासकीय सेवे अंतर्गत :- पदसिद्ध सर्व कामे वक्तशीर, प्रामाणिकपणे, काटेकोरपणे, सुव्यवस्थित. त्याव्यतिरिक्त सोपवली जाणारी अन्य वैशिष्ट्यपूर्ण विविध कामे तितक्याच काटेकोरपणे व स्वयंस्फूर्ततेने. संबंधित विभागाकडून दखल. विविध कामांबाबत अत्युकृष्ट’ अशी अनेक प्रशस्तीपत्रे—पारितोषीके.
संघटनात्मक:– महाराष्ट्र राज्य वीज व पाटबंधारे कामगार संघटनेच्या शाखेअंतर्गत संघटक या नात्याने संघटनेचे काम. अनेक कामगारांची छोटी मोठी कामे विनामूल्य. अडीअडचणीवेळी शक्य ती मदत.
निवडणूक प्रक्रियांमध्ये मतदान अधिकारी , मतदान केंद्राध्यक्ष पदांची जबाबदारी सांभाळली व अत्युत्कृष्ट योगदान दिले. त्याबद्दल महाराष्ट्र सरकार तर्फे प्रशस्तीपत्रे.
सुरुवातीपासूनच आपल्या सार्वजनिक, सामाजिक तसेच शासकीय जीवनामध्ये सर्व स्तरातील सर्वधर्मीय सर्वजातीय लोकांमध्ये प्रिय तसेच सर्वांना यथाशक्ती सहकार्य करण्यासाठी सुपरिचित व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध.
आध्यात्मिक (पूर्व व उत्तर आयुष्य) :
भक्तीचे बाळकडू:- वडील परमपूज्य रंगरावस्वामींकडून अगदी बालपणी परमेश्वर भक्तीची प्राथमिक दीक्षा भक्तीचा आरंभ.
अखंड भक्ती – अखंड भक्तीरत. कुठेही असो कोणत्या ना कोणत्या मार्गाने नित्यनेम अविरत चालू,
१९६४ : कमालीचे जागृत असलेले सर्व धर्मियांचे ऐक्य देवस्थान, परमकृपावंत – परमेश्वरस्वरुप दावल मलिक बाबासाहेब, शिवपुरी, ता. वाळवा, जि. सांगली येथे शिखरावर देवदर्शनार्थ प्रथम भेट. देवरायाचे परमकृपाशिर्वाद. महाभक्त बंडूमामांचे आशिर्वाद. पुढे बाबांची अविरत भक्ती.
१९७३ :- महाविद्यालयीन शिक्षणाच्या निमित्ताने गुरुवर्य प्रा. डॉ. वि. रा. तोडकर सर यांच्याशी भेट. निकट सहवासात. त्याच वर्षी व्दितीय आध्यात्मिक दीक्षा.शैक्षणिक गुरु तेच आध्यात्मिक गुरु. थिऑसफीशी संबंध जोडला गेला.
तीर्थक्षेत्रे:- भूवैकुंठ पंढरपूर, श्रीक्षेत्र औदुंबर, श्री सिद्धनाथ खरसुंडी, यांचेसह अनेक तीर्थक्षेत्रे, शिवालये, मठ आदी ठिकाणी वारंवार भक्तीपूर्णभेटी. ठिकठिकाणी आध्यात्मिक साधना अनेक भक्त संत-सत्पुरुषांशी संपर्क, अनेकांचे शुभाशिर्वाद, अनेक सत्संगात सहभाग.
१९९५ – परमपूज्य रंगरावस्वामींचे ब्रह्मी प्रयाण. अलौकिक घटना. अनेक परमेश्वरी साक्षात्कार.परमकृपावंत दावल मलिक साहेबांची पराकोटीची ब्रह्मीय दीक्षा .ग्रंथलेखनाची आज्ञा ॥ श्रीभक्ती श्रीहरीप्राप्ती मुक्ती ॥ ग्रंथाच्या लेखनास आरंभ.
१९९६ :- ग्रंथलेखन पूर्ण. संपूर्ण ग्रंथ दावल मलिकबाबांसमोर पुन्हा वाचून दाखवण्यात आला. शब्दा-शब्दास देवरायाची मान्यता घेण्यात आली.अशा रीतीने मलिकनाथांची ग्रंथास अंतिम मान्यता.
जाहीर प्रवचन सेवा:- मणदूर, ता. शिराळा, जि. सांगली), श्रीमद् ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सप्ताह १९९६ श्रीदेवी शेवताई मळाई काळम्मा मंदिर येथून जाहीर प्रवचन सेवेस प्रारंभ. तेथून पुढे अनेक गावात ज्ञानेश्वरीवर अनेक प्रवचने. ही प्रवचने कोणत्याही प्रकारचे मानधन किंवा प्रवास खर्चही न घेता, पूर्णपणे विनामूल्य अशा स्वरुपात देण्यात आली आहेत, येत आहेत.
‘श्री गुरुचरित्र’, ‘श्रीशिवलिलामृत’ या भक्तिग्रंथांवर देखील अनेक जाहीर प्रवचने. श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत या ग्रंथांवर देखील प्रवचने.
व्यक्तिगत प्रवचनसेवा: गरजेनुसार अनेकांना वैयक्तिक तसेच चारचौघात देखील अनेक प्रवचने, अनेक भक्तांचे श्रद्धास्थान.अशा रीतीने शेकडो प्रवचने.
सामुदायिक आध्यात्मिक उपक्रम:-
वारणावतीच्या श्रीदत्त विठ्ठल रखुमाई- महादेव मंदीरात १९९६ साली महाशिवरात्रीनिमित्त एकदिवशीय ‘श्रीशिवलिलामृत’ ग्रंथाच्या सामुदायिक पारायण सोहळयास प्रारंभ. पुढे दरवर्षी अखंड चालू.
इटकरे येथे श्रीदेवी तुकाई मंदिरात नवरात्रामध्ये जागरदिनी ‘श्रीदेवी महात्म्य’ ग्रंथाच्या एकदिवशीय पारायण प्रारंभास प्रेरणा.
श्रीमद् गीता ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सप्ताहामध्ये वारणावती येथे व्यासपीठचालक म्हणूनतीन वर्षे ईशसेवा.
‘श्रीशिवलिलामृत’ ग्रंथाच्या एकदिवसीय पारायण सोहळ्यात सलग १५ वर्षे व्यासपीठ चालक या नात्याने परमेश्वर सेवा.
इटकरे येथे ‘ईश्वरनिष्ठांची मंदियाळी’ नामक भक्तीसोहळे.
लेखन:- (उत्तर आयुष्य)
॥ श्रीभक्ती श्रीहरीप्राप्ती मुक्ती ॥ भक्ती ग्रंथ आणि श्रीमद् ज्ञानेश्वरी, गुरुचरित्र, श्रीशिवलिलामृत ग्रंथावर वेळोवेळी दिलेल्या अनेक जाहीर प्रवचनांचे लेखन. अभंगरचना
२००४- ।। श्रीभक्ती श्रीहरीप्राप्ती मुक्ती । ग्रंथ, शिवम् अध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान, कराड तर्फे प्रकाशित झाला. भक्तीपूर्ण प्रकाशन समारंभ इटकरे येथे. शिवपुरी, बावची, मणदूर येथे भावपूर्ण वितरण, पुनःप्रदर्शन स्वागत समारंभ.
‘अमृतधारा’युट्युब चॅनेल द्वारे जानेवारी २०२१ पासून आत्मिक उन्नतीसाठी प्रवचने, स्तोत्रे, त्यांचे मराठी अनुवाद ,श्रीमद्भगवद्गीता तसेच इतर अनेक अध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध, शुद्ध, यथार्थ ज्ञानाचे प्रसारण.
अक्षय तृतीया, शनिवार, २२एप्रिल २०२३ रोजी ‘ ते हे माझी माया तरले‘ या श्रीमद्गीता ज्ञानेश्वरी वरील प्रवचनांच्या पुस्तकाचे प्रकाशन. श्रीमद्गीता ज्ञानेश्वरी वरील प्रवचनांची इतर पुस्तके संकल्पित. तसेच श्री शिवलीलामृत आणि श्री गुरुचरित्र या ग्रंथांवरील प्रवचनांची पुस्तके संकल्पित.
इतर कौटुंबिक माहिती:
हरिभक्त परायण दिनकर यांच्या मातोश्री: सौ. लक्ष्मीबाई रंगराव महाडिक.
हरिभक्त परायण दिनकर यांची सुविद्य पत्नी: सौ. मंदाकिनी दिनकर महाडिक (गृहिणी).
हरिभक्त परायण दिनकर यांची कन्या: सौ. भारती पाटील. (B. A. (मराठी), B & ATT कोर्स, MS मॉंटेसरी सुपरवायझर, गृहिणी)
हरिभक्त परायण दिनकर यांचे पुत्र:
श्री सुदर्शन दिनकर महाडिक. (M.Sc. Physics B.Ed.) (Lecturer in Physics)
श्री मधुसूदन दिनकर महाडिक. (B. A. English LL. B LL.M. (App.) (दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी)